[From] mahamesh yojana 2019|online application

[From] mahamesh yojana 2019|online application

mahamesh yojana|mahamesh yojana online application|Mahamesh Yojana Form 2019-20|mahamesh yojana online form|raje yashwantrao mahamesh yojana|महामेष योजना

मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत 6 मुख्य घटकांसह राजे यशवंतराव होळकर महामेष ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या 46 कोटी 27 लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील म्हणजेच धनगर व तत्सम जमातींमधील सुमारे एक लाख कुटुंबियांकडून भटकंतीच्या स्वरुपात मेंढी पालन व्यवसाय केला जातो. त्यामुळे या समुहाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी शासनामार्फत मेंढीपालन या पारंपरिक व्यवसायास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

जागतिक पातळीवरील मेंढ्यांच्या मांसाचे सेवन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. तसेच देशातील दक्षिण भागातील राज्यांमध्ये मेंढीच्या मांसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या मासांच्या निर्यातीस मोठ्या प्रमाणावर वाव आहे. मेंढीपालन व्यवसाय ठाणबंद पद्धतीने केल्यास त्यातून प्राप्त होणाऱ्या घटकांची (मांस, दुध, लोकर इ.) व्यापारी दृष्टिकोनातून उत्पादने घेता येऊ शकतील. परिणामी, या व्यवसायातील नफा क्षमता वाढण्यास आणि मेंढीपालन व्यवसाय किफायतशीर होण्यात मदत होईल. त्यादृष्टीने आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वाचा आहे|

mahamesh yojana

राज्यात मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी 75 टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करण्यासंदर्भात नवीन योजना सुरू करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार 6 मुख्य घटकांसह नवीन योजनेस मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित 34 ग्रामीण जिल्ह्यांतील भटक्या जमातीला (भज-क) या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेच्या घटकांमध्ये 20 मेंढ्या व 1 मेंढा या प्रमाणात पायाभूत सुविधेसह एक हजार मेंढीगट वाटप करणे, तसेच या योजनेचे लाभार्थी नसणाऱ्या व स्वत:च्या मेंढ्या असणाऱ्या मेंढपाळास सुधारित प्रजातीचे 5340 नर मेंढे वाटप करणे, स्वत:च्या मेंढ्या असणाऱ्या एक हजार मेंढपाळांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान, सुमारे 13 लाख मेंढ्यांसाठी संतुलित खाद्य पुरविण्यासाठी अनुदान, कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचे मूरघास बनविण्यासाठी गासड्या बांधण्याची 25 यंत्रे खरेदी करण्यास प्रोत्साहन आणि राज्यात पाच ठिकाणी पशुखाद्य कारखाने निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान यांचा समावेश आहे. (हेही वाचा, धनगरांच्या शेळ्या-मेंढ्या विमानाने दुबईला; नाशिकच्या शेतकऱ्यांची गगनभरारी)

या योजनेंतर्गत पायाभूत सोयी-सुविधेसह मेंढीगट वाटप, सुधारित जातीचे नर मेंढे वाटप तसेच मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधा व मेंढ्यांसाठी पशुखाद्य पुरविण्यासाठी 75 टक्के अनुदान मिळणार असून 25 टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा राहणार आहे. त्याचप्रमाणे कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनविण्यासाठी गासड्या बांधण्याचे 25 यंत्र (Mini Silage Baler cum Wrapper) खरेदीसाठी (चार लाख मर्यादेपर्यंत) आणि मेंढ्यांसाठी पशुखाद्य तयार करणारे कारखाने उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान (पाच लाख मर्यादेपर्यंत) मिळणार आहे. योजनेनुसार 20 मेंढ्या व 1 मेंढानर (स्थायी-500 व स्थलांतरित-500) असे एकूण एक हजार मेंढीगटाचे वाटप करण्यात येणार असून पुढील 10 वर्षात सुधारित प्रजातीचे सुमारे 53 हजार 400 नर मेंढे वाटप करण्यात येतील. त्यापैकी यावर्षी 5340 नर मेंढे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.

mahamesh yojana 2019 marathi

त्याचप्रमाणे मेंढी गट योजनेचे लाभार्थी नसलेल्या व ज्यांच्याकडे स्वत:च्या मेंढ्या आहेत अशा मेंढपाळांसाठी 20 मेंढ्या व 1 मेंढानर असलेल्या 500 लाभार्थ्यांस (स्थायी 50, स्थलांतरित 450) आणि 40 मेंढ्या व 2 मेंढा नर असलेल्या 500 लाभार्थ्यांस (स्थायी 50, स्थलांतरित 450) मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यास देखील मान्यता देण्यात आली. या योजनेचे लाभार्थी नसलेल्या, मात्र स्वत:च्या मेंढ्या असलेल्या मेंढपाळांकडील स्थायी स्वरुपात पाळण्यात येणाऱ्या 1 लाख 29 हजार आणि स्थलांतरित स्वरुपात पाळण्यात येणाऱ्या 11 लाख 61 हजार एवढ्या मेंढ्यांसाठी संतुलित खाद्य पुरविण्यास देखील मान्यता देण्यात आली. लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस देण्यात आले आहेत.

माडग्याळ मेंढी संशोधन व संवर्धन केंद्राच्या स्थापनेसाठी माडग्याळ मेंढीचे उगमस्थान असलेल्या माडग्याळ गावच्या ग्रामपंचायतीकडून आवश्यक जागा महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर माडग्याळ येथे आणि सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी या दोन ठिकाणी केंद्र स्थापन करण्यास तत्त्वता मान्यत: देण्यात आली.

Apply for Mahamesh Yojana 2019-20

 • अर्जामध्ये दर्शविण्यात आलेल्या मुद्द्यांबाबतची माहिती अर्जदारांनी काळजीपूर्वक भरावी.
 • प्रत्येक मुद्द्याची माहिती भरून झाल्यावर “SAVE” चे बटण दाबावे म्हणजे भरलेली माहिती SAVE होईल.
 • त्यानंतर त्याच अर्जामध्ये योजने मधील कोणत्या उपघटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे त्याची निवड करण्यात यावी.
 • अर्ज सबमीट झाल्यानंतर “Application Form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज निवडीकरिता सादर झाल्याचे समजावे.
 • त्यानंतर “View receipt” या बटनावर क्लिक केल्यास अर्जाची पावती अर्जदारास दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्यावी.
 • अर्ज भरण्यापूर्वी व्हिडिओ बघा

Apply Mahamesh Yojana Form 2019-20

 • Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana  अर्ज करू इच्छित महाराष्ट्राचे नागरिक सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
 • आता Mahamesh Yojana अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला “User Login” हा पर्याय मिळेल
Mahamesh Yojana Form
 • या पर्यायावर क्लिक करा नवीन संगणक टॅब उघडा
 • नंतर आपल्याला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल
 • आता “लॉगिन” बटणावर क्लिक करा
Mahamesh Yojana Form
 • आता महामेश योजना फॉर्म 2019-20 आपल्या समोर उघडेल
 • सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक द्या
 • त्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा
 • आता राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या काळात सबमिट बटणावर क्लिक करा |
CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (7)
 • comment-avatar
  Sunil mane 23 hours

  माझी मेंढर आहेत मला या योजनेचा लाभ मिळावा

 • Disqus ( )
  error: Content is protected !!